आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील ओझरखेडे, पिंपळगाव बुद्रुक व तळवेल येथे एकाच रात्री चोरट्यांनी ११ ठिकाणी घडफोडी करून सहा लाख सात हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. सोमवारी मध्यरात्री या घटना घडल्या. घरफोडी झालेल्या घरातील कुटुंब घराच्या गच्चीवर झोपायला गेल्याची संधी चाेरट्यांनी साधली. या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अज्ञात चोरट्यांवर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी तालुक्यातील तळवेल येथे दोन, पिंपळगाव बुद्रुक येथे पाच व ओझरखेडे येथील चार अशा ठिकाणी चोरट्यांनी घरफोडी केली. त्यात रोख रकमेसह लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटना सकाळी उघडकीस आल्या. पिंपळगाव येथे आत्माराम कडू पाटील, रमेश लक्ष्मण पाटील, आनंदा सीताराम सरोदे, मधुकर सरोदे, ओझरखेडे येथे अशोक चावदस नेमाडे, गोकुळ तुकाराम नेमाडे व उमराव पाटील यापैकी नाशिकेत नेमाडे यांच्या घरातून ४ लाख ७५ हजार रुपये रोख व ऐवज लंपास केला. तळवेल येथेही दोन ठिकाणी घरफोडी झाली. घटनेची माहिती येथील पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाला गती दिली.
श्वान चॅम्पला केले पाचारण
परिसरातील तीन गावांमध्ये एकाच रात्री चोरट्यांनी चोरी केल्याने त्यांचा मागोवा घेण्यासाठी जळगाव येथील पथकातील चॅम्प श्वान व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. परंतु चॅम्प घरफोडी झालेल्या घराजवळच घुटमळल्याने चोरटे हे दुचाकी किंवा चारचाकी वाहनाने आले असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे. सहायक पोलिस निरीक्षक सुदर्शन बोरसे, पोहेकॉ विनोद चव्हाण, भेसराव राठोड तसेच अंगुली मुद्रा पथकाचे सपोनि वसंत कांबळे, फोटोग्राफर सचिन चौधरी, सहाय्यक फौजदार प्रकाश बारी, विनायक पाटील यांनी ठसे घेत तसेच तपासासाठी माहिती घेतली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.