आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसंगावधान:बसचे ब्रेक फेल,53 प्रवासी सुखरूप

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोदवडमध्ये आलेल्या भुसावळ-हरणखेडा बसचे शनिवारी सकाळी १०.४० वाजता अचानक ब्रेक फेल झाले. चालकाने प्रसंगावधान राखून बाजूलाच असलेल्या दुभाजकाला बस धडकवली. या दुर्घटनेत एसटीमधील सर्व ५३ प्रवासी सुखरूप बचावले. मात्र, दुभाजकाला धडकवण्याच्या प्रयत्नात एक दुचाकी एसटीखाली येऊन चक्काचूर झाली. भुसावळकडून आलेली हरणखेडा बस बोदवड बसस्थानकाकडे जात होती. जुन्या तहसील कार्यालयासमोरील थांब्यावर काही प्रवासी या बसमधून खाली उतरले. नंतर बसचे ब्रेक फेल झाले. मात्र चालक राजेंद्र बारींनी प्रसंगावधान दाखवले.

बातम्या आणखी आहेत...