आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळ-इगतपुरी मेमू:मेमू गाडीने जळगाव 30 रुपये, चाळीसगाव 60, तर नाशिक रोडसाठी मोजावे लागणार 95 रुपये

भुसावळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तब्बल २२ महिन्यांनंतर भुसावळ-देवळालीऐवजी आता भुसावळ-इगतपुरी मेमू गाडी सोमवारपासून सुरू होत आहे. मात्र, या गाडीला मेल आणि एक्स्प्रेसचा दर्जा आहे. त्यामुळे जळगावसाठी १० रुपयांऐवजी (पूर्वीचे पॅसेंजरचे भाडे) ३० रुपये मोजावे लागतील. यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागेल. या गाडीचे जनरल तिकीट देखील प्रवाशांना वेळेवर उपलब्ध होऊ शकणार आहे. कोरोनानंतर भुसावळ-इगतपुरी या मार्गावर प्रथमच मेमू गाडी सुरू होत आहे. तत्पूर्वी, गेल्या वर्षभरापासून देवळाली शटल अथवा मुंबई पॅसेंजर गाडी सुरू करावी, अशी मागणी वाढली होती.

मात्र, रेल्वे प्रशासनाने पॅसेंजर ऐवजी मेमू चालवण्याचा निर्णय घेतला. ती देखील भुसावळ-देवळाली ऐवजी इगतपुरी पर्यंत चालवण्यात येईल. दरम्यान, कोरोना काळात चालवल्या जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना विशेष दर्जा होता. त्यामुळे केवळ आरक्षण तिकीट असलेल्यांना त्यातून प्रवासाची परवानगी होती. दुसरीकडे पॅसेंजर गाड्या देखील बंद असल्याने सर्वसामान्य प्रवासी त्रस्त होते. विशेषत: लहान स्थानकांवरून ये-जा करणाऱ्यांचे हाल होते. त्यामुळे प्रवाशांच्या मागणीला ‘दिव्य मराठी’ने ठळक प्रसिद्धी दिली. त्याची दखल घेत मध्यंतरी भुसावळ-बडनेरा व भुसावळ-इटारसी मार्गावर मेमू गाडी सुरू झाली. आता १० जानेवारीपासून भुसावळ-इगतपुरी मेमू धावणार आहे. यामुळे नाशिक, कल्याणला जाणाऱ्या प्रवाशांची सोय होईल.

सकाळी ७ला सुरू होईल भुसावळातून प्रवास
ही गाडी भुसावळ जंक्शनवरून सकाळी ७ वाजता सुटेल. भादली ७.१३ , जळगाव ७.२४, शिरसोली ७.३४, माहेजी ७.५७, पाचोरा ८.२३, नगरदेवळा ८.५४, कजगाव ९.१४, चाळीसगाव १०.१८, हिरापूर १०.३४, नांदगाव ११.०९, मनमाड ११.४५, नाशिक १.१७, देवळाली १.२९, इगतपुरी ३.१० वाजता पोहोचेल. यामुळे पुढे कल्याण, मुंबईला जाणे सोयीचे होईल. कारण इगतपुरीपासून पुढे कसारापर्यत अनेक टॅक्सी धावतात. कसारा तेथून पुढे लोकलने प्रवास करून मुंबई गाठता येते. दरम्यान, भुसावळ सुटल्यानंतर ज्या ठिकाणी थांबा आहे, त्या स्थानकावर गाडी केवळ एक मिनिट थांबेल.

नवीन मेमू व पूर्वीच्या पॅसेंजरचे तिकीट दर
स्टेशन किमी मेमू पॅसेंजर
जळगाव ३० ३० १०
पाचोरा ७२ ४५ २०
चाळीसगाव ११७ ६० ३०
मनमाड १८४ ७५ ४०
नाशिक २५८ ९५ ५०
इगतपुरी ३०८ ११० ६५

बातम्या आणखी आहेत...