आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेढे:बसेस सजवून प्रवाशांना वाटले भुसावळात पेढे ; आगाराच्या बसेसची सजावट करण्यात आली

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य घेऊन गेल्या ७५ वर्षांपासून सेवा देणाऱ्या परिवहन महामंडळाचा वर्धापन दिन भुसावळ येथे साजरा झाला. यानिमित्त बसस्थानक आणि आगाराच्या बसेसची सजावट करण्यात आली होती. बसस्थानकात रांगोळ्या काढून प्रवाशांना पेढे वाटण्यात आले. एसटी महामंडळाच्या प्रवासी सेवेला तब्बल ७५ वर्षांचा काळ पूर्ण झाला. त्यामुळे यंदाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा केला. भुसावळ बसस्थानकावर बुधवारी सकाळी आगार प्रमुख पी.बी.चौधरी यांनी भुसावळ-नागपूर या बसची पूजा केली. कर्मचाऱ्यांनी बसस्थानक व परिसर स्वच्छ करून सर्वत्र फुले, केळीची खोडे, आंब्याच्या पानांची तोरणे लावून सुशोभीकरण केले. एकमेकांना शुभेच्छा दिल्या. बसस्थानकातील व बसमधील प्रवाशांना पेढे वाटून आनंद व्यक्त केला. भुसावळ येथून नागपूरसाठी खास लांब पल्ल्याची बस सुरू करण्यात आली. या बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अकोल्यापर्यंत अनेक प्रवासी या बसद्वारे गेले. आगार प्रमुख चौधरी, स्थानकप्रमुख पी.बी.भोई, एस.देवरे, वाहतूक नियंत्रक बी.व्ही.पवार ,कंट्रोलर भावना शिंपी व कर्मचाऱ्यांच्या हस्ते केक कापण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...