आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबुधवारी शिवसेनेसोबत असल्याची माहिती देणारे मुक्ताईनगरचे आमदार तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील हे देखील गुरुवारी एकनाथ शिंदे यांना जावून मिळाले. ते जळगाव येथून सूरत व तेथून विमानाने गुवाहाटीला गेले. याबाबत आमदार चंद्रकांत पाटील यांना संपर्क केला असता ते नॉट रिचेबल होते. तत्पूर्वी, बुधवारी रात्री ११ वाजता आमदार पाटील हे मुंबई येथून मुक्ताईनगर येथील त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. सकाळी काही ठिकाणी द्वारदर्शन करून त्यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली. नंतर त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी त्यांना जळगाव येथे पोहोचवले. तेथून ते सुरतकडे गेले. याबाबत कार्यकर्त्यांना विचारले असता ते म्हणाले की, आमदार पाटील यांना एक कॉल फोन आला.
यानंतर ते स्वतःच्या वाहनाने सकाळी ११ वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर येथून सूरतकडे रवाना झाले. त्यांचे सोबत तुषार बोरसे, दिलीप पाटील, प्रवीण चौधरी, गोपाळ सोनवणे सोबत होते. सूरत येथून ते विमानातून गुवाहाटीकडे रवाना झाले. यानंतर गुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास आमदार पाटील हे गुवाहाटीत शिवसेनेचे आमदार थांबलेल्या हॉटेलात दाखल झाल्याचे माध्यमातून समोर आले. गुरुवारी आमदार पाटील यांच्या घराकडे एकही कार्यकर्ता दिसला नाही. कार्यालयाकडे देखील शुकशुकाट होता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.