आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारेल्वे बोर्डाने नेमलेल्या ‘प्रवासी सुविधा समिती’ने गुरुवारी दोन तास भुसावळ जंक्शन स्थानकाची पाहणी केली. त्यात अनेक ठिकाणी अस्वच्छता पाहून संतप्त झालेल्या समिती सदस्यांनी स्थानकावरील सफाईचा ठेका रद्द करावा, अशी सूचना केली. यानंतर स्थानकातून जाणाऱ्या ११ प्रवाशांना थांबवून त्यांच्याकडे तिकिटाची मागणी केली.
मात्र, केवळ २ जणांकडे तिकीट, तर ९ जणांकडे तिकीट नव्हते. तिकीट तपासणीत होणारी हयगय पाहून समितीने अधिकाऱ्यांनी कानउघाडणी केली. रेल्वे बोर्डाकडून प्रवाशांसाठी वेगवेगळ्या सुविधा पुरवल्या जातात. मात्र, या सुविधा प्रत्यक्षात प्रवाशांना मिळतात किंवा नाही? या तपासणीसाठी भारत सरकारने नेमलेली प्रवासी सुविधा समिती सोमवारपासून भुसावळ विभाग दौऱ्यावर आहे. या समितीने गुरुवारी सकाळी ९ वाजता भुसावळ स्थानक गाठले. त्यात समिती प्रमुख डॉ. राजेंद्र फडके (वडोदा. ता.मुक्ताईनगर), कैलास वर्मा (मुंबई), विद्या अवस्थी (रायपूर), अभिलाश पांडे (जबलपूर) व छोटूभाई पाटील (सूरत) यांचा समावेश होता. समितीने स्थानकाच्या केला साईडिंगकडून बाजूने पाहणीला सुरूवात केली. तिकीट खिडकी, सरकते जिने, र्प्लटफॉर्मची पाहणी केली.
नंतर वेटिंग रूमची पाहणी करताना बंद आढळलेले रूम सुरू करण्यास सांगितले. सीसीटीव्ही कंट्रोल रूमची पाहणी करून खाद्य पदार्थांच्या स्टॉलला भेट दिली. प्लॅटफॅार्म चारवर बंद पडलेला स्टॉल सील करण्यास सांगितले. दरम्यान, या पाहणीचा अहवाल १९ मे रोजी दिल्ली येथे रेल्वे बोर्डाकडे मांडणार असल्याचे डॉ. राजेंद्र फडके यांनी सांगितले. दरम्यान, समितीने स्थानकावरील स्वच्छतेचा ठेका करण्यास सांगितला, ते कंत्राट लखनऊ येथील किंग सिक्युरिटी नामक संस्थेने घेतले आहे. २०१८ पासून ते ऑगस्ट २०२२ पर्यंत ठेक्याची मुदत आहे. तब्बल ९ कोटी रूपयांचा हा ठेका असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.