आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्घटना:कार-दुचाकीची धडक, अभियांत्रिकीचा विद्यार्थी जागीच ठार, एक गंभीर जखमी

भुसावळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय महामार्गावर बंद असलेल्या फेकरी टोल नाक्यापुढे एकेरी रस्ता आहे. याठिकाणी वरणगावकडे जाणारी कार आणि समोरून येणाऱ्या दुचाकीची धडक झाली. गुरुवारी सायंकाळी ७.१५ वाजता झालेल्या या अपघातात भुसावळ येथे घरी येणारा यश विनोद वाणी (वय २०) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. तो जळगाव येथे अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षाला होता. सोबतचा सागर शिंदे नामक अन्य एक जण जखमी झाला.

यश विनाेद वाणी (वय २०) हा वरणगावकडून भुसावळ येथे दुचाकीने येत होता. दीपनगर रेल्वे उड्डाणपूल परिसरात कारची जबर धडक बसली. त्यात यश व सागर जखमी झाले. त्यांना भुसावळ शहरातील खासगी हाॅस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे डाॅक्टरांनी यश याला मृत घाेषित केले. त्याच्या पश्चात आई-वडील, एक बहीण असा परिवार आहे. कौटुंबिक स्थिती बेताची आहे. तर जखमी सागरवर उपचार सुरू आहे. या अपघाताची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नितीन धांडे, देवा वाणी यांनी घटनास्थळी धाव घेतली.

कार घेतली ताब्यात
अपघातामधील कारमधून दोन्ही जखमींना भुसावळातील खासगी दवाखान्यात आणले गेले. तेथून बाजारपेठ पोलिसांनी कार (एमएच.१९-सीयू-९६९४) ताब्यात घेतली. ती नंतर भुसावळ तालुका पोलिसांकडे सोपवल्याचे एपीआय सुदर्शन वाघमारे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...