आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीजारोपण:संशोधन क्षेत्रात करिअरला संधी, त्याचे बीजारोपण विद्यार्थिदशेत करणे गरजेचे

] वरणगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक विद्यार्थी मेडिकल किंवा इंजिनिअर या दोन क्षेत्रांना प्राधान्य देतात. मात्र, तेथे जागा कमी व विद्यार्थी संख्या जास्त असल्याने अनेकांचे मार्ग चुकतात. त्यामुळे या दोन क्षेत्राव्यतिरिक्त इतरत्र चांगल्या संधी आहेत. त्यातल्या त्यात संशोधन क्षेत्रात करिअरची संधी आहे. त्याचे बीजारोपण विद्यार्थी दशेत झाले पाहिजे, असे आमदार संजय सावकारे यांनी सांगितले. दीपनगर येथील श्री शारदा माध्यमिक विद्यालयात आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आर.एन.गाजरे, तर डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, बीडीओ एकनाथ चौधरी, गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, शिक्षण विस्तार अधिकारी तुषार प्रधान, मानद चिटणीस व्ही.पी.राणे, माध्यमिक स्कूल चेअरमन ए.जी.पाटील डॉ.व्ही.बी.खाचणे, मिलिंद गाजरे, केंद्रप्रमुख कमलाकर चौधरी, विलास तायडे, प्राचार्य जी.डी.चौधरी, जे.बी.पाटील, डॉ.संजीव भटकर आदी उपस्थित होते. गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांनी प्रदर्शनात ७० शाळांनी सहभाग घेतल्याची माहिती दिली. दुपारच्या सत्रात बक्षीस वितरणासाठी तहसीलदार दीपक धिवरे, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता शैलेश पाटील उपस्थित होते. विज्ञान शिक्षिका नीलिमा पाटील, रूपाली राणे यांनी सहकार्य केले.

माध्यमिक विद्यार्थी उपकरण गट
प्रथम मसुद माफी लस्कर (हायड्रोलिक स्टीम, डी.एल.हिंदी हायस्कूल, भुसावळ), द्वितीय खेलेश महाजन (फार्मर प्लकर, सेंट अलॉयसेस हायस्कूल, भुसावळ) तृतीय रोहन कोळी (ट्रिग्नोमेट्रिक व्हील, सर्वोदय हायस्कूल किन्ही), उत्तेजनार्थ गायत्री ओळसकर (सेव अर्थ, माध्यमिक विद्यालय, ओझरखेडा).

प्राथमिक शिक्षकांचे शैक्षणिक साहित्य
प्रथम नामदेव महाजन (प्रॅक्टिकल मॅथ, जि.प.शाळा, मोंढाळे), द्वितीय मेघ:श्याम सपकाळे (ठोकळापाटी, जि.प.शाळा, किन्ही), तृतीय जे.पी.कांबळे (ओझोनची माहिती, ज्ञानज्योती विद्यालय, खडके). माध्यमिक शिक्षकांचे शैक्षणिक साहित्य : प्रथम लीना ढाके (मानवी मेंदूचा उभा छेद, जी.एस.चौधरी विद्यालय, वरणगाव).

जिल्हास्तरावर निवड झालेली विद्यार्थी प्राथमिक विद्यार्थ्यांचे उपकरण गट : प्रथम भाग्यश्री चौधरी (रेन वॉटर हार्वेस्टिंग, जि.प.शाळा, कन्हाळे), द्वितीय हुसेन शेख अस्लम खाटीक (पायथागोरस थेरम, बी.झेड.उर्दू हायस्कूल, भुसावळ), तृतीय रिया पाटील (स्मार्ट डस्टबीन (अहिल्यादेवी विद्यालय, भुसावळ), उत्तेजनार्थ भव्य चौधरी (जी.एस.चौधरी विद्यालय, वरणगाव).

बातम्या आणखी आहेत...