आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील बाबा तुलसीदास उदासी मार्केटमध्ये अतिक्रमण वाढले आहे. त्यातच तेथे कैरी विक्रेते, कैऱ्या फोडणाऱ्यांची गर्दी होत आहे. यावरून मार्केटमध्ये वाद सुरू झाले आहेत. बुधवारी याच भागात एका व्यापाऱ्याला मारहाणीचा प्रसंग उद्भवला. मात्र, काही सूज्ञ लोकांनी मध्यस्थी केल्याने वाद टळला. त्यामुळे पालिकेने लक्ष घालून मार्केटमधील अडथळे दूर करावे, अशी मागणी व्यापाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली.
व्यापाऱ्यांनी पालिकेला दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, बाबा तुलसीदास उदासी मार्केट, बोंडे मटण हॉटेल समोरील अतिक्रमण करून कैरी विक्रेता व्यवसाय करता. मात्र, हे विक्रेते आमच्याच दुकानांसमोर बसून आमच्याकडे येणाऱ्या ग्राहकांना दुकानांसमोर दुचाकी लावू देत नाही. आमच्या ग्राहकांना दुकानासमोर हाकलून लावताना दररोज वादविवाद करतात. आम्ही त्यांच्या उदरनिर्वाहाची विचार करतो. पण, ते आम्हा व्यावसायिकांना त्रास देतात. त्यामुळे कैऱ्या विक्रेत्यांची ही दादागिरी मोडून काढत त्यांना आमच्या दुकानासमोरून हटवावे. अन्य त्यांना इतरत्र जागा द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
कारवाई करा किंवा पर्यायी जागा द्या
व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकाऱ्यांसह बाजारपेठ पोलिस, शहर वाहतूक शाखेला देखील निवेदन देण्यात आले. निवेदनावर नहराजी शामनानी, बंटी डिंगरीया, चंद्रशेखर आंबेकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहे. या सर्वांनी कैरी विक्रेते व कैऱ्या फोडून देणाऱ्यांमुळे होणाऱ्या त्रासाचा पाढा वाचला. तसेच याप्रकरणी कारवाई किंवा कैरी विक्रेत्यांना पर्यायी जागा, अशी मागणी केली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.