आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहीम:वाहकांच्या तिकीट पेट्या व मोबाइल लंपास; एसटी आगारात चोऱ्या रोखण्यासाठी कडक तपासणी मोहीम सुरू

जलगाव20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगारातून एसटी वाहकांच्या तिकीट पेट्या व मोबाइल लंपास होण्याचे प्रकार वाढले होते. महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे प्रसिद्धी सचिव गोपाळ पाटील यांनी आगारात सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याबाबत पत्र दिले होते. त्याची दखल घेऊन विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्यांना आगारात कडक तपासणी मोहीम सुरू काण्याच्या सूचना दिल्या.

मे-जून दरम्यान आगारातून वाहकांच्या तिकीट पेट्या व मोबाइल लंपास झाले होते. आगारात अनेकदा बाहेरील व्यक्ती ह्या विनासायास ये-जा करतात. अशा व्यक्तींना पूर्ण चौकशीअंती आत सोडण्याच्या सूचना सुरक्षारक्षकांना करण्यात आल्या आहेत. सुरक्षा व दक्षता खात्यामार्फत सुरू झालेल्या या तपासणी मोहिमेमुळे बाहेरील व्यक्तींच्या आगार प्रवेशावर बंधन आले असून पार्किंगमधील वाहनांची संख्याही कमी झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...