आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा:संधीचा कॅच घेतला तर आयुष्याची‎ मॅच जिंकता येते; डॉ. उद्धव पाटील‎ यांचा सल्ला

बोदवड‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयुष्याच प्रगतीची संधी येत नाही,‎ ती निर्माण करावी लागते. योग्य‎ संधीचा कॅच तुम्ही घेतला तर‎ जीवनाची मॅच जिंकाल, असा‎ सल्ला माजी जि.प. सदस्य‎ डॉ.उद्धव पाटील यांनी युवकांना‎ दिला. तालुक्यातील भानखेडा येथे‎ आमदार चंद्रकांत पाटील पुरस्कृत,‎ बळीराजा चषक भव्य प्लास्टीक‎ बाॅल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन‎ करण्यात आले आहे, या स्पर्धेच्या‎ उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.‎ यावेळी बोदवडचे नगराध्यक्ष‎ आनंदा पाटील उपस्थित होते. दि.१‎ ते १५ या काळात ही स्पर्धा पार‎ पडणार आहे.

स्पर्धेचे प्रथम‎ पारितोषिक १५ हजार रुपये आमदार‎ चंद्रकांत पाटील यांच्यातर्फे, द्वितीय‎ पारितोषिक १० हजार रुपये‎ बाळासाहेबांची शिवसेनेचे सर्व‎ नगरसेवकांतर्फे व तृतीय पारितोषिक‎ ७ हजार रुपये माजी. जि.प. सदस्य‎ डॉ.उद्धव पाटील यांच्याहस्ते देण्यात‎ येणार आहे. नगरसेवक सईद‎ बागवान, नगरसेवक राजेश‎ नानवाणी, सुनील बोरसे, नीलेश‎ माळी, हर्षल बडगुजर, आयोजक‎ तुषार पाटील उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...