आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजारी पडण्याची भीती‎:तळई येथे हौदाची सफाई होत‎ नसल्याने पशुपालक नाराज‎

तळई‎14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एरंडोल तालुक्यातील तळई येथे‎ उत्राण, अंतुर्ली गिरड रस्त्यावरील‎ हौदाची सफाई हाेत नसल्याने तसेच‎ हा हाैद न धुतल्याने येथील‎ पशुपालक नाराज आहेत.‎ या हाैदात शेवाळ तसेच घाण‎ पाणी साचलेले असून पाण्यातून‎ येणाऱ्या दुर्गंधीमुळे त्या हौदातील‎ पाणी पशू पीत नाहीत. तर यामुळे ते‎ पशू आजारी पडण्याची भीती‎ पशुपालकांनी व्यक्त केली आहे.‎

याबाबत तळई ग्रामपंचायतीला‎ पशुपालक राहुल वाघ, समाधान‎ पाटील, किरण वाघ, राहुल‎ महाजन, वाल्मीक पाटील, जितेंद्र‎ पाटील, भानुदास पाटील, पवन‎ पाटील, संचित पाटील यासह इतर‎ पशुपालकांनी निवेदन देवून समस्या‎ मांडली आहे. दरम्यान, सध्या‎ महाराष्ट्रात लंपी सारख्या आजाराने‎ पशू दगावत आहेत. त्यामुळे सरपंच,‎ उपसरपंच तसेच लोकप्रतिनिधींनी‎ पाठपुरावा करून हौदाची सफाई‎ करून घ्यावी, अशी अपेक्षा आहे.‎

बातम्या आणखी आहेत...