आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:दुर्घटना रोखण्यासाठी रेल्वे इंजिनला सीसीटीव्ही कॅमेरे

श्रीकांत सराफ | भुसावळ15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्वे दुर्घटनांमध्ये अनेकवेळा कारण समोर येत नाही. हे ठोस कारण हाती यावे तसेच संभाव्य धोका वेळीच लक्षात आल्यास अपघात टाळता यावा, रेड सिग्नल ओलांडण्याच्या प्रकारांवर नियंत्रण यावे या उद्देशाने रेल्वे इंजिनच्या समोरील बाजूने उच्च क्षमतेचे प्रत्येकी दोन ते चार सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. सुमारे अर्धी किमी लांब अंतराच्या चित्रिकरणाची क्षमता असलेले हे कॅमेरे उणे १० ते जास्तीत जास्त ५५ डिग्री सेल्सियसमध्ये काम करू शकतात. त्यांची रेकॉर्डिंग ९० दिवसांपर्यंत राहील.

भुसावळ विभागातील देखील लवकरच किती इंजिनांवर कॅमेरे बसवायचे हे नियोजन प्राप्त होईल. हे सीसीटीव्ही कॅमेरे आईपी बेस्ट असतील. यामुळे रिमाेटच्या माध्यमातून त्यांना हाताळता येईल. त्यांचे चित्रीकरण हे सामान्यत: डिलिट हाेणार नाही. यात नाईट व्हीजनचा पर्याय असेल. त्यामुळे कमी प्रकाशात देखील स्पष्ट चित्रीकरण शक्य होईल.

उद्दिष्ट मिळणार
भारतीय रेल्वेत इटारसी येथे २०, न्यू कटनी जंक्शन १३, तुघलकाबाद येथे २२ इंजिनांना समोरून कॅमेरे लावले आहेत. पश्चिम मध्य रेल्वेत ४४५चे उद्दिष्ट आहे. तर भुसावळचे नियोजन लवकरच प्राप्त होईल.

केबिनवर ठेवणार नजर
केवळ रेल्वे इंजिनच्या समोरील बाजूनेच नव्हे तर लोको पायलट बसतात त्या केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावणे सुरू आहे. भुसावळ विभागात आतापर्यंत दोन इंजिनांमध्ये एकूण ८ कॅमेरे लावले आहेत.

बातम्या आणखी आहेत...