आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:विवरे गावात गणेशोत्सव उत्साहात साजरा करा-सोनवणे

रावेर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनामुळे दोन वर्षांपासून गणेशोत्सवावर बंधने होती. यंदा निर्बंधमुक्त श्रीगणेशोत्सव, नवदुर्गात्सव, दसरा, दिवाळी यासह येणारे सण-उत्सव कायदा सुव्यवस्था संभाळून साजरे करण्याचे आवाहन विवरे बुद्रूक येथे घेण्यात आलेल्या शांतता समिती बैठकीत उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांनी केले आहे.विवरे येथील बेंडाळे हायस्कूलमध्ये शांतता समितीची सोमवारी बैठक घेण्यात आली.

सर्वच जाती-धर्माच्या लोकांनी एकमेकांच्या उत्सवात सामील होवून आनंदोत्सव साजरा करावा. तसेच कायदा सुव्यवस्था राखली जाईल, याची दक्षता घेण्याचे आवाहन निंभोरा पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक काशीनाथ कोळंबे यांनी केले. हवालदार रा.का.पाटील, गोपनीयचे स्वप्नील पाटील यांनीही मार्गदर्शन केले. सरपंच युनूस तडवी, ग्रामपंचायत सदस्य विकास पाटील, युसूफ खाटीक, दीपक गाढे, पोलिस पाटील पंकज बेंडाळे, योगेश महाजन, गणेश मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तथा कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...