आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सण, उत्सव:आगामी सण, उत्सव कायदा अन् सुव्यवस्था सांभाळून साजरे करा : डॉ.कुणाल सोनवणे

रावेर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनामुळे बंद असलेल्या सण, उत्सव साजरे करण्यासाठी दोन वर्षानंतर सण, उत्सव साजरे करण्यासाठी शासनाने हिरवा कंदील दिला. मात्र आगामी महिनाभरात येणारे राम नवमी, महात्मा फुले जयंती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, हनुमान जयंती, रमजान ईद यासह सर्व सण, उत्सव कायदा व सुव्यवस्था संभाळून साजरे करा, असे आवाहन विवरे बुद्रूक येथे सोमवारी झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत फैजपूर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे यांनी केले.

कायदा सुव्यवस्था कायम राखली जाईल, याची दक्षता घेण्याचे आवाहन माजी सरपंच वासुदेव नरवाडे यांनी केले. या बैठकीला सपोनि शीतलकुमार नाईक यांनीही मार्गदर्शन केले. पोलिस उपनिरीक्षक काशिनाथ कोळंबे, सरपंच युनूस तडवी, ग्रा.पं. सदस्य संदीप पाटील, युसूफ खाटीक, मुस्लीम पंच कमिटीचे उपाध्यक्ष इस्माईल खान, चंद्रकांत गाढे, पंकज मोरे, समाधान गाढे, राजू गाढे, गोपनीय शाखेचे स्वप्नील पाटील, पोलिस पाटील पंकज बेंडाळे, योगेश महाजन यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. गावात पोलिसांनी पथसंचलनही केले.

बातम्या आणखी आहेत...