आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौण खनिजांची मोठ्या प्रमाणावर लूट:जामठीत गौण खनिजांची लूट प्रकरणी चाैकशी पूर्ण

जामठी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील गायरान परिसरामध्ये अवैधरीत्या गौण खनिजांची लूट करणाऱ्यांवर महसूल प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले असून साऱ्यांचे लक्ष त्याकडे लागले आहे.

येथे गेल्या अनेक दिवसांपासून अवैधरीत्या व चोरट्या मार्गाने गौण खनिजांची मोठ्या प्रमाणावर लूट सुरू आहे. याबाबत येथील ग्रामस्थ ईश्वर बाबूराव वाणी यांनी लेखी स्वरूपात ऑनलाइन पद्धतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे यापूर्वीच तक्रार केली आहे. तिची दखल घेत बोदवड तहसील प्रशासनाच्या वतीने या प्रकरणी नुकतीच चौकशी करण्यात आली. चौकशी अधिकारी म्हणून मंडळाधिकारी मधुकर पाटील, तलाठी रत्नानी, कोतवाल रामू भिल यांनी येथील गायरान परिसराची पाहणी केली. तेथे मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या गाैणखनिजाचे उत्खनन झाल्याचे समोर आले. तहसील प्रशासनाच्या वतीने येथील उत्खननाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्यात येईल असे मंडळाधिकारी पाटील यांनी सांगितले. येथून अन्यत्र गाैणखनिज विक्रीची बाब वाणी यांच्या लक्षात आल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली हाेती.

बातम्या आणखी आहेत...