आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्वमोसमी:जिल्ह्यात सोमवारपर्यंत पूर्वमोसमी सरींची शक्यता ; बागायती कपाशी लागवडीला वेग

भुसावळ21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात येत्या सोमवारपर्यंत तुरळक ठिकाणी पूर्वमोसमी पाऊस होईल. दुसरीकडे तापमान चाळिशीखाली येण्याची शक्यता असल्याने सिंचनाची व्यवस्था असलेल्या बागायती कपाशी लागवडीला वेग आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात सुरू असलेल्या वादळी पावसामुळे वातावरण बदलले आहे. खान्देशात बुधवारी तुरळक ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली होती. सोमवारपर्यंत अनेक ठिकाणी मेघगर्जेनेसह पाऊस होण्याचा अंदाज आहे. गुरुवारी जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. लवकरच त्यात घट येईल.

बातम्या आणखी आहेत...