आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात मध्यरात्रीनंतर दोन वाजता पाणीपुरवठा केला जातो. ही वेळ बदलण्यात यावी अशी मागणी ठाकरे गटाच्या युवासेनेने केली. याबाबतचे निवेदन युवा शिवसेनेने पालिकेत दिले. मध्यरात्रीनंतर दोन वाजता होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. मध्यरात्री नागरिकांना पाणी भरणे शक्य होत नाही. सुमारे दोन तास पाणी वाया जाते. त्यामुळे शुद्ध पाण्याची नासाडी होते. रात्रीच्या पाणीपुरवठ्याच्या वेळेत बदल करण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तातडीने वेळ न बदलल्यास तीव्र यावलला मध्यरात्री होणाऱ्या पाणीपुरवठ्याची वेळ बदलण्यासाठी पालिकेला निवेदन दिले.
आंदोलन करण्याचा इशारा युवा सेनेने दिला आहे. पालिका पाणीपुरवठा विभागाचे दादू धोत्रे यांच्याकडे युवा सेना प्रमुख सागर देवांग, शिवसेना शहर प्रमुख जगदीश कवडीवाले, शहर उपप्रमुख योगेश पाटील, डॉ.विवेक अडकमोल, विजय पंडित, संतोष धोबी, दीपक बहेडे यांच्या स्वाक्षरीने निवेदन देण्यात आले आहे.कचऱ्याची समस्या मांडली निवेदनातून शहरातील मेन रोडावर साचलेल्या कचऱ्याचीही समस्या मांडण्यात आली. मेनरोडवरील कचरा पालिकेने तातडीने उचलावा, अशी मागणी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.