आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शस्त्रक्रिया शिबिर:चाळीसगावात जनसेवा प्रतिष्ठानचे‎ दातृत्व; शिबिरात मोफत चष्मे वाटप‎

चाळीसगाव‎7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील विजय चौधरी जनसेवा‎ प्रतिष्ठान व मारवाडी युवा मंच‎ यांच्या संकल्पनेतून आणि रोटरी‎ आय हॉस्पिटल, मालेगाव यांच्या ‎ ‎ सहकार्याने १७ रोजी चौधरी वाडा‎ येथे मोफत भव्य नेत्र तपासणी व ‎शस्त्रक्रिया शिबिर पार पडले.‎

यावेळी परिसरातील व प्रभाग‎ क्रमांक चार मधील नागरिकांनी नेत्र‎ तपासणी करून घेतली. यावेळी‎ २०४ स्त्री- पुरुषांची नेत्र तपासणी‎ करण्यात आली. त्यापैकी १४‎ जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर‎ मालेगाव येथे करण्यात आली.‎ यावेळी लोकांना विजय चौधरी‎ जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने‎ महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा‎ युवा आघाडी, जिल्हाध्यक्ष विजय‎ चौधरी यांनी स्वखर्चाने चष्मे वाटप‎ केले.

चौधरी यांच्या या सेवाभावी‎ उपक्रमामुळे परिसरातील‎ नागरिकांनी समाधान व्यक्त केले.‎ शिबिरात तपासणीसाठी डॉ. साळुंखे‎ आणि टीम रोटरी आय हाॅस्पिटल,‎ ‎ ‎ ‎ ‎ मालेगाव यांनी परिश्रम घेतले. या‎ शिबिरास तेली समाज अध्यक्ष तथा‎ उद्योजक दिलीप चौधरी यांच्यासह‎ अनेकांनी भेट देऊन राबवलेल्या‎ उपक्रमाचे काैतुक केले. या‎ शिबिरामुळे अनेक गरजू रुग्णांना‎ फायदा मिळाला, तसेच मोफत‎ चष्मे मिळाले आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...