आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडी लहान मुलांना बाधक:बालदमा अन् टाइफाॅइडचे बालरुग्ण 20 % वाढले; गोवर रुग्ण मात्र नाही

भुसावळ9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाढलेली थंडी लहान मुलांना बाधक ठरत आहे. प्रामुख्याने ऑक्टोबरच्या तुलनेत आता एक महिना ते १६ वर्षांच्या आतील मुलांना ताप, कफ, बालदमा, न्युमोनिया, टाइफाॅइडचा त्रास वाढला आहे. गत महिन्यात शहरातील बालरोग तज्ज्ञांच्या ओपीडीत टायफॉइड, सर्दी-खोकल्याचे सरासरी १०० रुग्ण असायचे. ही संख्या आता सरासरी १२० ते १३० पर्यंत पोहोचली आहे.

पालिका दवाखान्याच्या ओपीडीत १५० पैकी ४० रुग्ण १ ते १६ वयोगटातील आहेत.शहराचे किमान घसरल्याने लहान मुलांमध्ये बालदम्यासह त्वचेचे विकार वाढले आहेत. परिणामी पालिकेच्या दवाखान्यासोबतच शहरातील बालरोग तज्ज्ञांची ओपीडी वाढली आहे.

बालदमा अन्‎ टायफाइडचे बालरुग्ण ..‎ पालिकेच्या दवाखान्यात गेल्या‎ पंधरा दिवसांपूर्वी आेपीडीमध्ये‎ सरासरी १०० रुग्ण असायचे. त्यात‎ बाल रुग्णांची संख्या सरासरी २० ते‎ २२ असायची. आता थंडीमुळे‎ आजारांनी डोके वर काढल्याने‎ ओपीडी १५०पर्यंत पोहोचली आहे.‎ त्यात बाल रुग्णांची संख्या सरासरी‎ ४० आहे. सर्दी-खोकला, ताप,‎ त्वचा कोरडी पडून खाज येणे अशा‎ त्यांच्या तक्रारी आहेत.

शहरातील‎ प्रमुख चार बालरोग तज्ज्ञांच्या‎ खासगी दवाखान्यांची ओपीडी‎ ऑक्टोबरमध्ये ८० ते १०० पर्यंत‎ होती. ही संख्या आता १२० ते‎ १३०पर्यंत आहे. त्यात चार वर्षांच्या‎ मुलांमध्ये न्युमोनियाचा त्रास दिसतो.‎ बालदम्याने डोके वर काढल्याने‎ श्वसन विकाराच्या तक्रारी, त्वचा‎ लाल हाेणे व अंगाला खाज‎ येण्याच्या तक्रारी आहेत.‎

श्वासाची गती आणि ताप वाढल्यास डॉक्टरांकडे जा
कुटुंबात कुणाला सर्दी, खोकला, ताप असल्याच लहान मुलांपासून लांब राहावे. सहा महिन्यांवरील मुलांना स्वाईन फ्लूची लस दिल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढीस मदत होते. मुलांची श्वास घेण्याची गती वाढली आणि ताप तीन दिवस राहिल्यास डाॅक्टांराचा सल्ला घ्यावा. - डॉ.समीर खानापूरकर, बालराेग तज्ज्ञ, भुसावळ

बातम्या आणखी आहेत...