आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुणगाैरव:साळी समाजातील मुलांनी अधिकारी बनून समाजाची सेवा करावी : चव्हाण

भुसावळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

युवक, युवतींनी शिक्षण घेत माेठ्या पदावर अधिकारी बनावे आणि त्या माध्यमातून गाेरगरीबांना मार्गदर्शन करावे. हीच समाजाची सेवा असल्याचे प्रतिपादन रवींद्र चव्हाण यांनी केले. साळी समाज साह्यकारी मंडळातर्फे कमल गणपती हाॅलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गाैरव कार्यक्रमाचे आयाेजन केले हाेते, त्यावेळी ते बाेलत हाेते.

याप्रसंगी हेमंत निकुंभ, नाशिक, बाबुराव चव्हाण व केशव अहिर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित हाेते. मान्यवरांच्या हस्ते श्री जिव्हेश्वर भगवान यांना पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते निवृत्त कर्मचाऱ्यांसह समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचाही गाैरव करण्यात आला. त्यांना राेख बक्षिसे देण्यात आली. यावेळी नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात अध्यक्षपदी रवींद्र गणपत चव्हाण, उपाध्यक्ष विजय अहिर, सेक्रेटरी हेमंत दाणी, सहसेक्रेटरी शंकर भुसे, खजिनदार शिवाजी वाढे, सदस्यपदी गाेपाळ सूर्यवंशी, दत्तात्रय टेकाडे, हेमंत वाघ, प्रकाश करसाळे, गणेश आढाव व आेंकार चव्हाण यांची निवड करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...