आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळेच हुडहुडी:राज्यात अनेक ठिकाणी तापमान 13 अंशांवर, थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता

भुसावळ6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाेव्हेंबर महिन्यातील दुसऱ्या पंधरवाड्याच्या सुरूवातीलाच तापमानात माेठी घसरण झाली आहे. गेल्या आठ दिवसांपासून तापमानात घट कायम असून बुधवारी किमान तापमान १३ अंशांवर हाेते. कमाल व किमान तापमानातील घसरण कायम असल्याने भुसावळसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात थंडीची तीव्रता कायम आहे. त्यात वाढ होऊ शकते.

राज्यात सध्या जाेर पकडलेल्या थंडीसाठी उत्तरेतून वाहत येणाऱ्या थंड वाऱ्याचे कारण सांगितले जात आहे. उत्तरेत थंडी अधिक आहे. तिकडचे थंड वारे महाराष्ट्रातून दक्षिणेकडे वाहत असल्याने राज्यात थंडीची तीव्रता वाढली आहे. किमान तापमानात घट झाली असून तापमान १५ अंशावरून १३ अंशापर्यंत खाली आलेले आहे. गेल्या तीन दिवसात किमान तापमान १५ ते १३ अंशाच्या जवळपास स्थिरावले आहे. दरम्यान, उत्तरेकडील थंड वारे कायम राहिल्यास तापमानात पुन्हा घट येऊ शकते.

दिवसा गारठा
किमान तापमानासाेबतच कमाल तापमानात देखील घट झाल्याने सकाळी ११ वाजेपर्यंत गारठा जाणवत असून दुपारी ४ वाजेनंतर पुन्हा थंडी जाणवते. त्यामुळे रात्रीसह दिवसादेखील थंडी जाणवत आहे. चांगल्या पावसामुळे जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र वाढले असून ग्रामीण भागात त्यामुळे थंडीची तीव्रता वाढल्याचे जाणवते.

बातम्या आणखी आहेत...