आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:चोरवडला दाम्पत्यास मारहाण; सरपंच पतीसह 11 जणांविरुद्ध गुन्हा

भुसावळ22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चोरवड येथे शुक्रवारी रात्री सरपंच पतीसह ११ लोकांनी घरात प्रवेश करून दाम्पत्य व भांडण सोडवण्यासाठी आलेल्या व्यक्तीला मारहाण केली. तालुका पोलिसांत ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

शुक्रवारी रात्री ११ वाजता प्रवीण नथू गुंजाळ यांच्यासह धनराज नथू गुंजाळ, अनिकेत अमृत गुंजाळ, जयेश धनराज गुंजाळ, विशाल धनराज गुंजाळ, लक्ष्मण राजाराम कळस्कर, अमृत नथू गुंजाळ, सिद्धेश पाटील, इब्राहिम गवळी आदींनी संगीता कैलास दुबोले यांच्या घरात प्रवेश केला. कैलास दुबोले यांना मारहाण केली. प्रवीण गुंजाळने संगीता दुबोले यांना ढकलून दिले. रवींद्र दुबोले, शांताराम भवर, विद्या भवर हे भांडण सोडण्यासाठी आले असता त्यांनाही मारहाण केली. गुन्हा दाखल करण्यात गेल्यास ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करायला लावू, अशी धमकी दिली.

बातम्या आणखी आहेत...