आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेत्यांची प्रतिष्ठा:कुऱ्हा काकोडा ग्रामपंचायत‎ ताब्यात ठेवण्यासाठी चुरस‎

कुऱ्हा14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काकोडा‎ आगामी १८ डिसेंबरला होत‎ असलेल्या कुऱ्हा ग्रामपंचायतची ‎निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदे‎ गट व भाजप या तिन्ही पक्षासाठी ‎ ‎ प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे पदाधिकारी‎ व कार्यकर्ते मोर्चेबांधणीला लागले ‎आहेत.‎ कुऱ्हा गावात सहा प्रभागांमध्ये १७ ‎सदस्य व लोकनियुक्त सरपंच‎ निवडून येणार आहेत. त्यांचे भविष्य‎ एकूण ७८४९ मतदार ठरवणार‎ आहेत. २८ नोव्हेंबरपासून उमेदवारी‎ अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे.‎

पुन्हा लोकनियुक्त सरपंच पद‎ असल्यामुळे व ओबीसी राखीव‎ असल्यामुळे अनेकांच्या आशा‎ पल्लवीत झालेल्या आहेत. गेल्या‎ पाच वर्षात गावात केलेली विकास‎ कामे व गावातील समस्या, माजी‎ मंत्री एकनाथ खडसे राष्ट्रवादीत‎ गेल्यामुळे बदललेली समीकरणे,‎ तसेच शिंदे गटात सामील झालेले‎ आमदार चंद्रकांत पाटील व‎ भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक‎ कांडेलकर यांच्यासाठी ही‎ निवडणूक प्रतिष्ठेची आहे.

येणाऱ्या‎ जिल्हा परिषद व पंचायत समिती या‎ मिनी मंत्रालयाच्या निवडणुका‎ असल्यामुळे, ग्रामपंचायत‎ आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी‎ नेत्यांना प्रतिष्ठा पणाला लावावी‎ लागेल. त्यामुळे थंडीच्या दिवसात‎ कुऱ्हा गावातील राजकारण तापत‎ आहे. गेल्या पाच वर्षापासून कुऱ्हा‎ गावातील समस्या, झालेली‎ विकासकामे, गावातील बस‎ स्थानक, पाण्याची समस्या,‎ पाण्याची टाकी पूर्ण होऊनही तिचा‎ वापर सुरु झालेला नाही. आठवडे‎ बाजाराच्या दिवशी वाहतूक‎ कोंडीचा प्रश्न निर्माण होतो. तसेच‎ विकासकामांमध्ये अडचणी‎ आणल्याचा मुद्दा कळीचा ठरणार‎ आहे. या मुद्यांवरच प्रत्येक पक्षातील‎ उमेदवारांचा प्रचार अवलंबून‎ असेल. त्यामुळे मतदार कोणाला‎ कौल देणार याची उत्सुकता आहे.‎

बातम्या आणखी आहेत...