आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षतोडीचे प्रमाण वाढले:नागरिकांनी रोखली अवैध वृक्षतोड

भुसावळ24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील टीव्ही टॉवर, गंगावाडी भागात अवैध वृक्षतोडीचा प्रयत्न परिसरातील नागरिकांनी हाणून पाडला. पालिकेची परवानगी नसताना कडूनिंब व वडाचे झाड तोडण्यात येत होते. त्यास नागरिकांनी विरोध केला.

शहरातील टीव्ही टॉवर सर्वे नंबर १६५मध्ये वड व निंबाचे झाड तोडण्यासाठी मजूर दाखल झाले. झाड तोडणे सुरू असताना परिसरातील संतोष पाटील, नीलिमा पाटील, मंगेश नेहेते, श्रीकृष्ण कोल्हे, हितेश टेकवाणी, पुष्पा पाटील, भावेश पाटील, सिध्दी पाटील, सुरेश राणे, मधुकर पाटील यांनी झाडे तोडणारे सुरेश खुशलानी यांचेकडे पालिकेच्या परवानगीची मागणी केली. मात्र, खुशलानी यांनी केवळ पालिकेकडे परवानगीसाठी अर्ज केला होता. पालिकेकडून त्यास लेखी मंजुरी नव्हती. तरीही ते वृक्षतोड करत असल्याने नागरिकांनी हा प्रकार थांबवला. दरम्यान, शहरात शनिवार आणि रविवार सुटीच्या दिवशी अवैध वृक्षतोडीचे प्रमाण वाढले आहे. पालिकेकडे तक्रार केल्यानंतर कारवाई होत नसल्याने हे प्रकार वाढले आहेत.

बातम्या आणखी आहेत...