आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रांताधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव‎:भुसावळात 30 उपद्रवींचे‎ शहरबंदीचे प्रस्ताव सादर‎

भुसावळ‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील ऑर्म अॅक्टमधील संशयीत व तीन पेक्षा‎ जास्त गुन्हे दाखल असलेल्या ३० उपद्रवींना‎ धुलिवंदन, शिवजयंतीच्या काळात शहरबंदी केली‎ जाणार आहे. त्या आशयाचा प्रस्ताव पाेलिस‎ प्रशासनाने प्रांताधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात‎ आले आहेत.‎ शहरात गेल्या दाेन वर्षांच्या काळात ज्यांच्याविरुद्ध‎ आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल आहेत, तसेच तीनपेक्षा‎ जास्त गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असणाऱ्या ३०‎ जणांचे शहरबंदीचे प्रस्ताव पाेलिस प्रशासनाकडून‎ तयार करण्यात आले आहेत.

या उपद्रवींना हाेळी,‎ धुलीवंदन, शिवजयंती या काळात शहरबंदी करण्यात‎ यावी, असा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.‎ डीवायएसपी साेमनाथ वाघचाैरे यांच्या माध्यमातून हे‎ प्रस्ताव प्रांताधिकारी कार्यालयाकडे पाठवले आहेत.‎ या प्रस्तावांवर येत्या दाेन ते तीन दिवसात निर्णय‎ अपेक्षित आहे. पाेलिस प्रशासनाने या ३० जणांची नावे‎ अद्याप जाहीर केलेली नाहीत. आगामी सण, उत्सव‎ शांततेत पार पडावेत, म्हणून ही प्रक्रिया राबवली जात‎ आहे. बाजारपेठ, शहर आणि तालुका पोलिस‎ ठाण्यातील उपद्रवींचा यात समावेश आहे.‎

बातम्या आणखी आहेत...