आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन प्रमुख विक्रेत्यांकडे ६० टक्के बुकिंग:कमी वेळेत १०० टक्के विसर्जनामुळे मातीच्या मूर्तींना पसंती

भुसावळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना काळात निर्बंधांमुळे बहुतांश भाविकांनी घरीच गणरायाचे विसर्जन केले. मात्र, बादलीत विसर्जित केलेली पीओपीची गणेशमूर्ती दोन महिने उलटूनही पाण्यात विरघळली नाही. मातीची मूर्ती मात्र चार दिवसांत विरघळली. यामुळे मातीच्या मूर्तीचे १०० टक्के विसर्जन होते, यावर अनेकांचा विश्वास बसला. परिणामी यंदा शहरवासीयांचा मातीच्या गणेशमूर्ती खरेदीकडे कल वाढला असून तीन प्रमुख विक्रेत्यांकडे ६० टक्के बुकिंग झाली आहे.

गणेशोत्सवात पीओपीच्या मूर्तींची स्थापना केली जाते. मात्र, विसर्जनानंतर या मूर्ती अनेक महिने नदीपात्रात पडून असतात. त्यातून उत्सवाचे पावित्र्य लोप पावते. हा प्रकार पाहता शहरात पीओपी एवजी मातीची गणेशमूर्ती स्थापनेचा ट्रेंड वाढला आहे. दरम्यान, शहरात चार ते पाच जण मातीच्या मूर्ती तयार करतात. सध्या त्यांच्याकडे ३० वेगवेगळ्या प्रकारातील मूर्ती उपलब्ध आहेत. त्यात पुणे येथील दगडू शेठ हलवाई, मुंबईतील लालबागचा राजा, चिंच पोकळीचा राजा, पुण्यातील मंडईचा राजा शारदा गणपती, प्रदीप मिश्रा महाराजांच्या शिवपुजेवरील आधारीत महादेवाची पुजा करणार कुंदकेश्वर गणेश, पुण्याचा पेशवा गणपती, नंदीवर बसलेले महादेवाच्या रूपातील श्रीगणेश, इच्छापूर्ती गणपती, दोन उंदरांवर हात ठेवून बसलेले मुषकराज गणपतीचा समावेश आहे.

पेण येथील मूर्तीला मागणी
शाडूमातीपासून मूर्ती तयार करणारे शांती नगरातील मूर्तिकार रमाकांत भालेराव यांच्याकडे पेण येथील प्रसिद्ध गणेशमूर्ती उपलब्ध आहेत. यापूर्वी मोजके भाविक या मूर्ती खरेदी करायचे. मात्र, आता पर्यावरणीय जाणिवा जागृत झाल्याने सर्वसामान्य भाविक देखील मातीच्या गणेश मूर्तींबद्दल विचारणा व बुकिंग करत आहेत, असे शिवाजी नगरातील मूर्तिकार दिलीप प्रजापती, रमाकांत भालेराव यांनी सांगितले.

यंदा ८० टक्के बुकिंग
आम्ही ६ ते २४ इंच उंचीच्या मूर्ती तयार केल्या आहेत. यापैकी ८० टक्के मूर्तींची बुकिंग झाली. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा शाडूमातीच्या मूर्तींना सर्वाधिक प्रतिसाद मिळताना दिसतो. यंदा उत्सवावर कोणतेही निर्बंध नसल्याने उत्साह जाणवतो.
दिनेश कनोजे, मूर्तीकार, ओंकारेश्वर मंदिर परिसर

बातम्या आणखी आहेत...