आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छता माेहिम:डीआरएम कार्यालयातील अधिकारी; कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम‎

भुसावळ‎8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील रेल्वेच्या डीआरएम‎ कार्यालयात, स्वच्छता‎ पंधरवड्यानिमित्त स्वच्छता मोहीम‎ राबवण्यात आली. वरिष्ठ वाणिज्य‎ प्रबंधक डाॅ. शिवराज मानसपुरे यांनी‎ स्वत: हातात झाडू घेतला. त्यासोबत‎ सर्वच अधिकारी आणि‎ कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला. ५०‎ पेक्षा जास्त कर्मचारी स्वच्छता‎ माेहिमेत सामील झाले हाेते.‎ डीआरएम कार्यालयाच्या‎ परिसरात माेठ्या प्रमाणावर‎ पावसामुळे गवत उगवले हाेते.

‎ यामुळे या परिसरात डासांचा‎ प्रादृभाव वाढला हाेता. स्वच्छता‎ पंधरवड्यात डाॅ. मानसपुरे यांनी हा‎ परिसर स्वच्छ करण्याबाबात‎ कर्मचाऱ्यांना सूचना देत, स्वत:‎ स्वच्छता माेहिमेत सहभाग घेतला.‎ यामुळे वाणिज्य विभागातील सर्वच‎ कर्मचारी या माेहिमेत सहभागी झाले‎ हाेते.

कर्मचाऱ्यांनी कार्यालयाच्या‎ आवारात उगवलेले गाजर गवत‎ स्वच्छ केले. गाजर गवत काढून‎ टाकल्याने परिसर स्वच्छ झाला‎ आहे. स्वच्छता माेहिमेत विविध‎ विभागातील कर्मचारी सामील झाले‎ हाेते. यात सहायक वाणिज्य प्रबंधक‎ अनिल पाठक, अनिल बागले‎ यांच्यासह विविध अधिकारी,‎ कर्मचारी यांचा समावेश होता.