आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:समुपदेशनाने गैरसमज दूर; पती-पत्नीचे मनोमिलन

भुसावळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

किरकाेळ कारणावरून पती-पत्नीमध्ये झालेले वाद आणि गैरसमज यामुळे ते विभक्त हाेण्याच्या मार्गावर आले हाेते. मात्र भाेरगाव लेवा पंचायतीत विभक्त हाेण्यापूर्वी हे प्रकरण आले असता स्वातंत्र दिनाच्या दिवशीच त्यावर सुनावणी केली जाणार हाेती. मात्र एकत्र बसवून दाेघांच्या मनात एकमेकांविरुद्ध झालेले गैरसमज दूर करत विभक्त हाेणाऱ्या पती-पत्नीचे मनाेमीलन घडून आले. घटस्फाेटाच्या उंबरठ्यावर असलेल्या या दाम्पत्याने भाेरगाव लेवा पंचायतीत एकमेकांना पेढा भरवत पुन्हा नव्याने संसार उभा करण्याचा निर्धार केला.

देश ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना, एका विभक्त होणाऱ्या जोडप्याच्या आयुष्यात पुन्हा आनंद निर्माण करण्याचे काम भाेरगाव लेवा पंचायतीने केले. आशिषकुमार सुरेश चौधरी व पल्लवी आशिषकुमार चौधरी (रा. चांदुरबिस्वा, ता. नांदुरा, जि. बुलढाणा) या जोडप्यात मतभेद सुरू होते. गैरसमजामुळे ते दिवसेंदिवस वाढत गेले व शेवटी प्रकरण घटस्फोटापर्यंत येऊन पोहोचले.

दाेघांची समुपदेशातून समजूत
दरम्यान हे प्रकरण भोरगाव लेवा पंचायतीच्या भुसावळ शाखेत आले. यावेळी समुपदेशक आरती चौधरी यांनी पल्लवी व तिच्या पतीला समजावून त्यांचे समुपदेशन केले. त्यांच्यातील गैरसमज दूर केले. शेवटी घटस्फोटासाठी आलेल्या पल्लवीने अचानक आपला विचार बदलून स्वतः नवऱ्याकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली. आणि आजचा दिवस चांगला असल्याचे सांगून विवाहितेने सासरी नांदायला जायचे सांगितले. आणि दोघा पती-पत्नींनी आनंदाने एकमेकास पेढा भरवला. यानंतर दाेघांना त्यांच्या घरी रवाना केले.

यावेळी भोरगाव लेवा पंचायतीचे अध्यक्ष अॅड.प्रकाश पाटील, सचिव डॉ.बाळू पाटील, सुहास चौधरी व समुपदेशक आरती चौधरी हजर होत्या.दरम्यान दाम्पत्याच्या नातेवाइकांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.

विवाह जाेडण्याला प्राधान्य
भाेरगाव लेवा पंचायतीतर्फे विभक्त हाेणाऱ्या पती-पत्नीचा संसार कसा पुन्हा सुरू हाेईल, ते विभक्त न हाेता, कसे एकत्र राहतील यावर जास्त लक्ष दिले जाते. पती-पत्नी या दाेघांना दाेन-दाेन वेळेस स्वतंत्र समुपदेशन केले जाते. त्यांच्या मनातील एकमेकांविषयी झालेले गैरसमज दूर केले जातात. आणि पुन्हा त्यांचा संसार पूर्वीसारखाच आनंदाने व्हावा, याच उद्देशाने मुलीस सासरी पाठवले जातेे. असे समुपदेशक आरती चाैधरींनी सांगितले

बातम्या आणखी आहेत...