आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रॅक्टर जप्त:दीपनगरातील कोळशाची चोरी; ट्रॅक्टर केले जप्त

भुसावळ9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दीपनगरातील बॉयलरसाठी लागणाऱ्या कोळशाची चोरी करताना डीवायएसपी साेमनाथ वाघचाैरे यांच्या पथकाने ट्रॅक्टर पकडले. यात १२ हजार रुपये किमतीच्या दोन टन कोळशासह दोन लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टरही जप्त केले. या प्रकरणी पाेलिस स्वत: फिर्यादी झाले असून यासीन सत्तार पिंजारी यांच्या फिर्यादीनुसार ट्रॅक्टर चालक सचिन उत्तम सुरवाडे (रा. झेडटीएस, फेकरी, साळवे नगर, भुसावळ) याच्याविरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

दीपनगरातील कोळशाची चोरटी वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती डीवायएसपी वाघचौरेंना मिळाली. त्यांनी त्या माहितीची खात्री करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्यात. पथकातील हवालदार नंदकुमार सोनवणे, रमण सुरळकर, यासिन पिंजारी यांनी फेकरी बसस्थानकासमोर बोगद्याच्या आडोशाला बुधवारी मध्यरात्री ट्रॅक्टर (एमएच २५ एच ४२६) येताच ते थांबवून त्याची तपासणी केली. यावेळी त्यात कोळसा मिळून आला. चालक सचिन सुरवाडे याची चाैकशी केली असता त्याने कुठलेही उत्तर न दिल्याने लेखी समज देत पाेलिसांनी ट्रॅक्टर जप्त केले. दरम्यान चालक न आल्याने ट्रॅक्टरमधील दोन टन कोळसा चोरीचा असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांत गुन्हा दाखल झाला.