आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:फुलगाव शिवारात‎ कोळशाची चोरी; तिघांविरुद्ध‎ गुन्हा; आराेपींचे पलायन‎

वरणगाव18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ तालुक्यातील‎ फुलगाव शिवारात दीपनगर औष्णिक विद्युत‎ केंद्राचा कोळसा चोरताना दोन जणांना‎ पकडण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध‎ येथील पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल‎ करण्यात आला. ही घटना रविवारी दुपारी‎ दोन वाजता घडली. फुलगाव येथील‎ सद्गुरु हॉल जवळ दीपनगर येथे कोळसा‎ वाहतूक करणाऱ्या रेल्वेच्या वॅगनमधून‎ कोळसा चोरी करून ट्रॅक्टरमध्ये नेत‎ असताना बापू बाविस्कर व जितू चंद्रकांत‎ पाटील, दोन्ही रा. फुलगाव व एक अज्ञात‎ व्यक्ती यांना दीपनगर येथील सुरक्षारक्षकांनी‎ १० क्विंटल कोळशासह पकडले.

परंतु त्यांनी‎ सुटका करून घेत ट्रॅक्टरसह पलायन केले.‎ या प्रकरणी औष्णिक विद्युत केंद्राचे सुरक्षा‎ अधिकारी राजेश हरी तळेले, रा.किन्ही‎ यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिस‎ ठाण्यात तिघांविरुद्ध चाेरीचा गुन्हा दाखल‎ करण्यात आला. तपास पाेलिस उपनिरीक्षक‎ इस्माईल शेख करत आहेत. दरम्यान या‎ कारवाईमुळे काेळसा चाेरी करणाऱ्यांमध्ये‎ खळबळ उडाली असून पाेलिसांचा वचक‎ निर्माण हाेऊ शकणार आहे.‎

बातम्या आणखी आहेत...