आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिणाम:थंडीचा जोर , पश्चिमी विक्षोभाचा होतोय परिणाम

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या तीन दिवसांपूर्वी शहराचे कमाल तापमान ३३, तर रात्रीचे किमान तापमान १७ अंश होते. मात्र, पश्चिमी विक्षोभाच्या परिणामामुळे शनिवारी कमाल तापमानात तीन अंशांची वाढ होऊन ते ३६, तर किमान तापमान पाचने वाढून २२ अंशांवर पोहोचले. यामुळे थंडीचा जोर काही अंशी कमी झाला.

नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी माघार घेतल्यानंतर थंडीचे प्रमाण वाढले होते. चार दिवसांपूर्वी तर किमान तापमान १७.२ आणि कमाल तापमान ३३ अंशांपर्यंत खाली घसरले होते. मात्र, पश्चिमी विक्षेाभाच्या परिणामाने कमाल तापमान वाढून ३५ अंशांपर्यंत गेले. यापूर्वी अभ्यासकांनी दुपारी १२ ते ४ या वेळेत तापमानात वाढीचा अंदाज वर्तवला होता. हा अंदाज खरा ठरला.

१५ नोव्हेंबरनंतर थंडी
६ ते १४ नोव्हेंबरदरम्यान किमान तापमान १७, तर कमाल तापमान ३६पर्यंत राहिल. १५ नोव्हेंबरनंतर मात्र तापमानाही घट होईल, अशी माहिती वेलनेस वेदरचे संचालक नीलेश गोरे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...