आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातांदलवाडीसह परिसरात तापमानाचा पारा घसरल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे रात्रीसह भर दिवसाही शेकोट्यांचा आधार घेतला जात आहे. परिसरातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. कधी थंडी तर कधी ढगाळ वातावरणाची निर्मिती होत असून त्याचा शेती पिकांवर दुष्परिणाम जाणवत आहे. दरम्यान तापमानाचा पारा घसरून थंडीचा कडाका वाढल्याने वातावरणात कमालीचा गारठा निर्माण झाला आहे. परिणामी अाता दिवसाही ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जातआहेत. दरम्यान, या बदलत्या वातावरणाचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होताना दिसत आहे.
गेल्या तीन-चार दिवसांपासून थंडीचा कडाका वाढल्याने रात्री तसेच दिवसा गार वारे वाहत आहेत. सर्वत्र धुकेही पसरले असून नागरिकांना सर्दी, ताप आणि खोकल्याचा त्रास जाणवत असल्याची अनेकांची ओरड आहे. पिकांवर किडींचे आक्रमण बदलत्या वातावरणाचा परिणाम पिकांवर देखील झाला आहे. विशेषत: तूर, हरभरा पिकांवर किडींचा प्रादुर्भाव पसरला आहे. तसेच वाढत्या थंडीमुळे केळीवर करप्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत. शेतकऱ्यांनी कापणी व तोडणी केलेल्या शेतमालाची योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तापमानात आणखी घसरण होऊन पुन्हा थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
थंडीचा कडाका वाढल्याने भर दिवसा शेकोट्या पेटून गप्पा रंगताहेत. पिकांवर किडींचे आक्रमण : बदलत्या वातावरणाचा परिणाम पिकांवर देखील झाला आहे. विशेषत: तूर, हरभरा पिकांवर किडींचा प्रादुर्भाव पसरला आहे. तसेच वाढत्या थंडीमुळे केळीवर करप्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत. शेतकऱ्यांनी कापणी व तोडणी केलेल्या शेतमालाची योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तापमानात आणखी घसरण होऊन पुन्हा थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पिकांवर किडींचे आक्रमण : बदलत्या वातावरणाचा परिणाम पिकांवर देखील झाला आहे. विशेषत: तूर, हरभरा पिकांवर किडींचा प्रादुर्भाव पसरला आहे. तसेच वाढत्या थंडीमुळे केळीवर करप्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत. शेतकऱ्यांनी कापणी व तोडणी केलेल्या शेतमालाची योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तापमानात आणखी घसरण होऊन पुन्हा थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.