आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवडाभरात नगरपालिकेने वसूल केले 54 लाख‎:थकबाकीदारांच्या घरी‎ डफ वाजवून कर वसुली‎

भुसावळ‎7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पालिकेने शहरातील थकबाकी‎ वसुलीसाठी थकबाकीद रांच्या‎ घरासमोर डफ वाजवून वसूली सुरु‎ केली आहे. गेल्या आठवडाभरात‎ पालिकेने या मोहिमेतून ५४ लाख‎ रुपये वसूल केले आहेत. आता‎ पालिका प्रशासन थकीत मालमत्ता‎ धारकांची दुकाने व पालिकेचे गाळे‎ सील करण्याची मोहीम राबवणार‎ आहे. यासाठी प्रत्येक श्रेणीतील टॉप‎ थकबाकीदारांची यादी तयार करण्यात‎ आली आहे.‎ पालिकेची थकबाकी वसूली कमी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ होत असल्याने शहराला, राज्य‎ शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानावर‎ परिणाम होत आहे.‎

नोटीसनंतर कारवाई‎थकीत गाळेधारक तसेच‎ करदात्यांना वारंवार सूचना देवूनही‎ कराची रक्कम भरली जात नाही.‎ करदात्यांना नोटीस बजावल्या आहेत.‎ यानंतरही थकबाकी न भरल्यास‎ दुकाने सिल केली जातील. सध्या‎ घरासमोर डफ वाजवून वसूली सुरु‎ आहे. यात चांगला प्रतिसाद मिळत‎ असून थकबाकी वसूली होत आहे.‎ - चेतन पाटील , कर अधीक्षक‎

बातम्या आणखी आहेत...