आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गून्हेवृत्त:कोम्बिंग ऑपरेशनमध्ये एक संशयित पकडला, सावदा पोलिसांनी अचानक केली कारवाई

सावदा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही दिवसांपासून चिनावल परिसरात भुरटे चोर, टवाळखोरांनी उपद्रव माजवून शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सत्र कायम ठेवले आहे. या प्रकारांवर पायबंद घालण्यासाठी सावदा पोलिस अॅक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी १६ मार्चच्या मध्यरात्री चिनावल, वाघोदा, वडगाव, कोचूर, रोझोदा, सावखेडा, कळमोदा गावांचा परिसर व शेत शिवारात कोम्बिंग ऑपरेशन राबवले. त्यात वडगाव येथील यासिन तडवी या संशयिताला मध्यरात्री ताब्यात घेण्यात आले आहे.कारवाईदरम्यान पोलिसांनी संशयित असणाऱ्या प्रत्येकाची झाडाझडती घेतली. सावद्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक देविदास इंगोले, निंभोऱ्याचे एपीआय गणेश धुमाळ, उपनिरीक्षक राजेंद्र पवार, समाधान गायकवाड, मेहमूद शहा, उमेश पाटील, विनोद पाटील, पांडुरंग सपकाळे यांनी ही कारवाई केली. त्यात ८ पकड वॉरंट व १२ समन्स बजावण्यात आले. मुंबई ॲकट १२२ प्रमाणे सूर्यास्तापासून ते सूर्योदयापर्यंत संशयित रित्या फिरणाऱ्या वडगाव येथील संशयित यासिन तडवी याला मोठा वाघोदा येथे मध्यरात्री अटक केली. नाकाबंदी करून ११ वाहन चालकांकडून ३५०० रुपये दंड, तर ३५ वाहने, एक लॉज, चार हॉटेल, चार हिस्ट्रिसीटर संशयितांची तपासणी केली. दरम्यान, चिनावल येथे बंदोबस्त कायम ठेवला आहे.

बातम्या आणखी आहेत...