आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनस्तापाचा शिधा:अपूर्ण शिधा किट वाटपाची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार ; चौकशी करण्याची मागणी

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळी संपून आठवडा उलटला तरीही तालुक्यातील ३९ हजार ७५३ पैकी ३५ हजार लाभार्थींना आनंदाचा शिधा किटमधील संपूर्ण वस्तू मिळालेल्या नाहीत. याबाबत ‘दिव्य मराठी’ने वृत्त प्रसिद्ध करताच आमदार संजय सावकारे यांनी बुधवारी मुंबईत मुख्यमंत्री, अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांकडे तक्रार केली. यासाठी दिलेल्या पत्रात भुसावळात किट वाटपाला होणाऱ्या दिरंगाईची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

गाेरगरीबांची दिवाळी गोड व्हावी या हेतूने राज्य शासनाने १०० रुपयांत प्रत्येकी एक किलो रवा, साखर, चनाडाळ व तेल असे चार वस्तूंचे किट देण्याची घोषणा केली. मात्र, भुसावळात ही घोषणा केवळ कागदावरची ठरली आहे. कारण, दिवाळी संपून आठवडा झाला तरीही केवळ रव्याचा अपवाद वगळता एकही वस्तूचा मागणीप्रमाणे पुरवठा झालेला नाही. यामुळे त्रस्त लाभार्थी शिंदे-फडणवीस सरकारच्या नावाने बोटे मोडताना दिसतात. दरम्यान, या दिरंगाईबाबत ‘दिव्य मराठी’ने बुधवारी ‘आनंदाचा नव्हे, हा मनस्तापाचा शिधा’ असे वृत्त प्रसिद्ध केले. त्याची दखल घेत आमदार सावकारे यांनी मुख्यमंत्री कार्यालय, अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांच्या कार्यालयात पत्र दिले. त्यात किट वितरणास झालेल्या दिरंगाईची चौकशी करावी, अशी मागणी केली.

बातम्या आणखी आहेत...