आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षतोडी:मसाकातील अवैध वृक्षतोडीची तक्रार;‎ अजूनही चौकशी, कारवाई का नाही

यावलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

यावल‎ तालुक्यातील फैजपूर जवळील‎ मधुकर सहकारी साखर‎ कारखान्याच्या आवारातील अनेक‎ झाडे बेकायदेशीरपणे तोडण्यात‎ आली. याबाबत तक्रार करूनही‎ अजून चौकशी, कारवाई झालेली‎ नाही. याबाबत फैजपूरच्या माजी‎ नगराध्यक्षांसह शिवसेना, राष्ट्रवादी‎ काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी‎ मंगळवारी तहसीलदारांची भेट‎ घेतली.‎ फैजपूरजवळील मधुकर‎ सहकारी साखर कारखाना जिल्हा‎ बँकेने थकीत कर्जापोटी विक्री केला‎ होता. या विक्रीनंतर संबंधित‎ खरेदीदाराने कारखान्याच्या‎ आवारातील सुमारे ४० वर्षे‎ वाढलेली हिरवेगार झाडे तोडली.

हा‎ प्रकार कारखान्यात आंदोलन‎ करताना शेतकरी तथा राष्ट्रवादी‎ काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस‎ विजय प्रेमचंद पाटील व भाजपचे‎ युवा जिल्हा सरचिटणीस राकेश‎ फेगडे यांच्या निदर्शनास आला.‎ यानंतर दोन्ही पदाधिकाऱ्यांनी‎ प्रांताधिकारी कैलास कडलग,‎ तहसीलदार महेश पवार आणि वन‎ विभागाचे (पूर्व) वनक्षेत्र अधिकारी‎ विक्रम पदमोर यांच्याकडे‎ निवेदनातून तक्रार केली.

मात्र,‎ अद्यापही या प्रकरणी कोणतीही‎ कारवाई झालेली नाही. त्यामुळे‎ फैजपूरचे माजी नगराध्यक्ष नीलेश‎ राणे, शिवसेनेचे मुन्ना पाटील व‎ काँग्रेसचे पदाधिकारी तथा नावरे‎ माजी सरपंच समाधान पाटील,‎ ललित चौधरी यांनी मंगळवारी‎ तहसीलदार महेश पवार यांची भेट‎ घेतली. वृक्षतोडीची चौकशी व‎ कारवाईची मागणी केली. दरम्यान,‎ राज्याच्या हिवाळी अधिवेशनात‎ मसाकाच्या विक्री प्रक्रियेला राज्य‎ सरकारने स्थगिती देण्याची घोषणा‎ केली. यानंतर कधी साखर निर्यात‎ कोटा, तर कधी वृक्षतोड या‎ मुद्द्यावर मसाका चर्चेत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...