आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:भुसावळात ३९ ग्रा.पं.चे संगणक बंद; वेतन रखडल्याने संगणक परिचालकांचे आंदोलन

भुसावळ7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या चार महिन्यापासून वेतन मिळत नसल्याने तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींच्या संगणक परिचालकांनी, गुरुवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. वेतन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय संगणक परिचालक संघटनेने घेतला आहे.

सात हजार रुपये अशा तुटपुंज्या वेतनावर संगणक परिचालक काम करतात. त्यांना चार महिन्यापासून वेतन मिळालेले नाही. वारंवार शासनाकडे मागणी करूनही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे गुरुवारी तालुक्यातील सर्व ३९ संगणक परिचालकांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. यासंदर्भात गटविकास अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले आहे. त्या संगणक परिचालकांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, अशी मागणी निवेदनात नमूद केली आहे. तुटपुंजे वेतनही दरमहा मिळत नसल्याने, थकीत वेतन एकत्रित मिळावे, अशा मागण्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...