आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळात प्रवाशांना मनस्ताप:आरक्षित तिकिटावर बस क्रमांक नसल्याने गोंधळ

भुसावळ25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळीच्या सुट्यांमध्ये एसटीचे सीट आरक्षित करुन प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र, आरक्षण करताना बसचा क्रमांक दिला जात नाही. तिकिटावर केवळ वेळ दिली जाते. यामुळे बसस्थानकात आल्यावर आपली नेमकी आरक्षित बस कोणती? हा संभ्रम प्रवाशांमध्ये निर्माण होतो. भुसावळ आगारातून औरंगाबादचे आरक्षण केलेल्या प्रवाशांना एकाच वेळी तीन बस दिसतात यामुळे गोंधळात भर पडते.

दिवाळीनंतरही प्रवाशांची गर्दी कायम आहे. त्यामुळे एसटी प्रवासात जागा मिळण्यासाठी प्रवासी ऑनलाइन सीट आरक्षित करतात. या आरक्षित तिकिटावर केवळ गाडीची वेळ आणि ट्रीप नंबर असतो. भुसावळ ते औरंगाबादचे तिकीट असेल तर त्यावर गाडी क्रमांक देणे अपेक्षित आहे.

मात्र, केवळ वेळ दिल्याने एकाचवेळी औरंगाबादच्या दोन, तीन एसटी स्थानकात उभ्या असल्यास आपली बस नेमकी कोणती? हे कळत नाही. काही कर्मचारी सांगतात की गाड्या डेपोवर तयार असतात, पण वाहक आणि चालक वेळेवर येत नसल्याने ही फजिती होते. त्यात जादा गाड्या सोडल्याने वेळेचे आणि गाडीचा गोंधळ आणखी वाढतो. प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो.

बातम्या आणखी आहेत...