आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन‎:मुक्ताईनगरात काँग्रेसचे आंदोलन‎

मुक्ताईनगर‎9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्टेट बँक व एलआयसी या देशाच्या‎ सर्वात मोठ्या बँकिंग व्यवस्थेत जमा‎ झालेला गोरगरीब, नाेकरदार यांचा‎ पैसा कोणत्याही प्रकारे विश्वासार्हता‎ न पाहता अदानी समूहाला कर्ज‎ स्वरुपात दिल्याबद्दल देशाचे पंतप्रधान‎ नरेंद्र मोदी यांचा मुक्ताईनगर तालुका‎ काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध‎ करण्यात आला. त्यासाठी आंदोलन‎ करण्यात आले.‎

पंतप्रधानांनी स्वतःच्या मित्राला‎ सामान्य लोकांचा बँकांमध्ये व‎ एलआयसीमध्ये जमा झालेला पैसा‎‎‎‎‎‎‎‎‎‎ गैर प्रकारे कर्ज म्हणून दिल्याबद्दल‎ प्रदेश सदस्य डॉ.जगदीश पाटील व‎ तालुकाध्यक्ष दिनेश पाटील यांच्या‎ नेतृत्वाखाली हे निषेध आंदोलन‎ करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा‎ सरचिटणीस संजय पाटील,‎‎‎‎‎‎‎‎‎‎ कार्याध्यक्ष राजू जाधव, ग्रामपंचायत‎ सदस्य गजानन पाटील, बी.डी. गवई,‎ निखिल चौधरी, सेवा दलाचे‎ तालुकाध्यक्ष प्रा.सुभाष पाटील,‎ एस.सी.सेलचे शहराध्यक्ष भाऊराव‎ बोदडे व कार्यकर्ते उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...