आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसंदर्भात असंवेदनशील वक्तव्य केले. त्यांचा निषेध आणि सत्तार यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमिटीने तहसीलदारांना निवेदन दिले. कृषीमंत्र्यांनी शेतकरी हिताचे निर्णय घेणे अपेक्षित अाहे. तसेच शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रभावी धोरण ठरवून त्याची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. मात्र, तसे न करता ते शेतकरी आत्महत्या काही नवीन नाहीत.
शेतकरी आत्महत्या करतच असतात, अशा स्वरूपाचे निंदनीय व बेजबाबदार विधान मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. हा प्रकार म्हणजे राज्याच्या कृषी मंत्र्याने शेतकरी वर्गाची एक प्रकारे केलेली थट्टा आहे, असा आरोप करत मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमिटीने मंत्री सत्तार यांचा निषेध केला. तसेच त्यांना कृषी मंत्रिपदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. अब्दुल सत्तार यांनी त्वरित राजीनामा द्यावा. किंवा त्यांना तात्काळ मंत्रिपदावरून बडतर्फ करावे अशी मागणी करणारे निवेदन काँग्रेस १४ मार्चला मुक्ताईनगरच्या तहसीलदारांना दिले. याप्रसंगी काँग्रेसचे पदाधिकारी अॅड.पल्लवी रेणके, अॅड.अरविंद गोसावी, एस.ए.भोई, डॉ.जगदीश पाटील, दिनेश पाटील, बी.डी. गवई, अनिल वाडीले, एन.आर.चव्हाण, सुमन चौधरी, प्रा.सुभाष पाटील, शामराव भोई, निखिल चौधरी, अॅड.रमेश हागे आदींची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.