आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस कमिटी:केंद्र सरकारविरुद्ध काँग्रेसची निदर्शने

भुसावळ9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महागाई, इंधन दरवाढ, जीवनावश्यक वस्तूंवर लावलेला ५ टक्के जीएसटी, अग्निपथ योजनेला विरोध करण्यासाठी काँग्रेसने शुक्रवारी विभागात आंदोलन केले. भुसावळ येथे शहर काँग्रेस कमिटी, अल्पसंख्याक विभाग, महिला काँग्रेस, सेवा दलाने तहसीलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने केली.

केंद्रातील मोदी सरकारने सध्या जीएसटीतून व्यापाऱ्यांची लूट सुरु केली आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. अग्निपथ योजनांमुळे बेरोजगारी वाढेल. यासोबतच ईडीचा राजकीय सूडबुद्धीतून दुरुपयोग केला जातो, अशी टीका काँग्रेसने केली. यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष मो. मुनव्वर खान, शहराध्यक्ष रवींद्र निकम, हमीद शेख, सलीम गवळी, यास्मीन बानो, संजय खडसे, विवेक नरवडे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...