आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहणी:रिंगरोडवर दुभाजकाची होतेय उभारणी, नाल्यावरील पुलाचे काम झाले पूर्ण

भुसावळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील रिंग रोडवर दुभाजक उभारणीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सुरू करण्यात आले आहे. तसेच याच मार्गावरील नाल्यावर पुलाची उभारणी झाली आहे. यामुळे या परिसरातील सुमारे आठ हजार नागरिकांना पुलाचा उपयोग होणार आहे. शहरातील यावल रोडपासून ते लोणारी हॉलपर्यंत रिंगरोडवर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे पहिल्या टप्प्यातील कामे सुरू करण्यात आली आहेत. रस्त्याचे काम झाल्यानंतर आता दुभाजकाची उभारणी केली जात आहे. तसेच कमल गणपती हॉलजवळील नाल्यावर पुलाची उभारणी झाली आहे. या पुलाची लांबी १६ मीटर असून रुंदी १० मीटर तर उंची पाच मीटर आहे. पुलाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे रहदारीतील मोठी अडचण दूर झाली आहे. बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता सी.डी.तायडे, शाखा अभियंता रविंद्र बाविस्कर यांनी पाहणी केली.

बातम्या आणखी आहेत...