आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्स्फूर्त प्रतिसाद:भुसावळात ग्राहकांनी 12 किलो खरेदी केले सोने ; सोन्याची विक्री झाल्याचा अंदाज

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनानंतर आलेली बाजारातील मंदिची मरगळ दसऱ्याने झटकली. शहरात दसऱ्याला सोने, चांदीचे दागिने, रेडीमेड कपडे, गृहोपयोगी वस्तू, दुचाकी आदींच्या खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दसऱ्याला सोने खरेदीकडे सर्वाधिक कल राहिला. शहरात किमान १२ किलो सोन्याची विक्री झाल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे. दरम्यान शहरातील विविध दुचाकींच्या शोरुममधून ४५० दुचाकींची विक्री झाली. रेल्वे कर्मचाऱ्यांना दसऱ्याच्या पूर्वीच दिवाळी बोनस मिळाल्याने बाजारात उत्साह संचारला आहे. बुधवारी सकाळपासून शहरातील रेडीमेड कपड्यांच्या दुकानांमध्ये गर्दी होती. तर दसऱ्याला सोने खरेदीला अनन्यसाधारण महत्व असल्याने सराफा बाजारातही ग्राहकांची गर्दी होती.

बातम्या आणखी आहेत...