आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहॉट सिटी म्हणून ओळख असलेल्या भुसावळ शहरात दिवाळीदरम्यान थंडीचे आगमन झाले. किमान तापमान १७ अंशांपर्यंत घसरले. मात्र आता रात्री व पहाटे थंडी, तर दिवसा तापमानवाढीमुळे उकाडा अशी विषम स्थिती निर्माण झाली आहे. शहराचे कमाल तापमान २८ अंशांवर घसरले होते, पश्चिमी विक्षोभाच्या परिणामामुळे ते आता ३६, तर किमान तापमानही २२ अंशांपर्यंत वाढले आहे.
पश्चिमी विक्षोभाच्या परिणामामुळे थंडीचा जोर कमी होऊन कमाल तापमान ८ अंशांनी वाढून ३६वर पोहोचले आहे. गेल्या पंधरवड्यात हेच कमाल तापमान २८ अंशांपर्यंत घसरले होते. त्यात वाढ झाल्याने दिवसा उकाडा जाणवतो. दुसरीकडे १७ अंशांपर्यंत घसरलेले रात्रीचे किमान तापमान ५ अंशांनी वाढून २२ पर्यंत गेले. शहरातील वेलनेस वेदरचे संचालक नीलेश गोरे यांच्या अभ्यासानुसार १५ नोव्हेंबरपासून थंडी वाढेल.
रुग्णसंख्या वाढतेय
वातावरणातील बदलांमुळे संसर्गजन्य आजारांनी डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. सर्दी, खोकला, गळ्याच्या इन्फेक्शनच्या तक्रारी आहेत. तापमानातील तफावतीमध्ये स्थिरता आल्यानंतर हे प्रमाण कमी होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.