आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचा धोका:सव्वादोन महिन्यांनंतर भुसावळात कोरोना रुग्ण; मुंबईला गेलेली महिला चाचणीत पॉझिटिव्ह

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढती असताना शहरात २६ मार्चपासून एकही नवीन रुग्ण नव्हता. मात्र, मुंबईत शस्त्रक्रियेसाठी गेलेल्या शहरातील ५७ वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही महिला काही दिवसांपासून पुणे येथे वास्तव्यास असल्याने शहरातील कुटुंबीयांच्या संपर्कात नसल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

कोरोनाचे रुग्ण वाढते असल्याने राज्यात चौथ्या लाटेची चिंता निर्माण झाली आहे. असे असले तरी शहरात गेल्या दोन महिन्यांपासून एकही नवीन रुग्ण न आढळल्याने सर्व जण निश्चिंत होते. संसर्गाचे प्रमाण नसल्याने आरोग्य यंत्रणेने सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र, शहरातील ५७ वर्षीय महिलेस हृदयविकारावरील शस्त्रक्रियेसाठी मुंबईला नेण्यात आले होते. तेथे शस्त्रक्रियेपूर्वी केलेल्या कोरोना चाचणीत त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आता या महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

असे असले तरी शस्त्रक्रियेसाठी अॅडमीट होण्यापूर्वी ही महिला पूणे येथे वास्तव्यास होती. शहरातील कुटुंबीयांसोबत त्यांचा संपर्क आला नाही. यामुळे काँटॅक्ट ट्रेसिंगची आवश्यकता नाही. असे असले तरी शहरात कोरोनाचे रुग्ण वाढू नयेत यासाठी चाचण्यांची संख्या वाढवली जाणार आहे. इतर रुग्ण वाढले तरी शहरात संसर्ग वाढणार नाही, याची काळजी घेतली जात असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. सोबतच नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाताना तोंडाला मास्क अवश्य लावावा, असे आवाहन देखील केले.

लसीकरणावर देणार जोर
भुसावळ शहरात कोरोनाचा पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण ८७ टक्के आहे. हे प्रमाण १०० टक्के करण्यासाठी हर घर दस्तक अभियान राबवले जात आहे. दुसरा डोस प्रलंबित असलेले, बूस्टर डोसचे प्रमाण वाढवून संसर्गाविरुद्ध लढण्यासाठी इम्युनिटी विकसीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या सोबतच १२ ते १४ व १५ ते १७ वयोगटातील बालकांच्या लसीकरणावर भर आहे. त्यासाठी शाळा सुरु झाल्यानंतर विशेष शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...