आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राथमिक आरोग्य केंद्राचा उपक्रम:किनगाव स्कूलच्या 40 विद्यार्थ्यांना कोरोना लस

यावलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील किनगाव येथील डोणगाव रोडवरील इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूल व ज्युनियर काॅलेजच्या ४० विद्यार्थ्यांना, कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्यात आला. उर्वरीत विद्यार्थ्यांना दुसऱ्या टप्प्यात लस देण्यात येणार आहे.

किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय आधीकारी डॉ. मनिषा महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सहाय्यक यु.ए.पाटील, आरोग्य सेविका कविता सपकाळे, आरोग्य सेवक जे.के.सोनवणे, डी.पी.तायडे व आशा सेविका सरला पाटील यांनी लसीकरण केले. यावेळी प्राचार्य अशोक पाटील, उपप्राचार्य राजश्री अहिरराव, हर्षल मोरे, योगीता बिहारी, देवयानी सोळुंके, मिलिंद भालेराव, भावना चोपडे, प्रतिभा धनगर, गोपाळ चित्ते, अनिल बारेला, पवनकुमार महाजन, संपत पावरा, वैशाली धांडे, शाहरूख खान, सुहास भालेराव, प्रतिक तायडे, पुजा शिरोडे, तुषार धांडे, नूतन देशमुख, सृष्टी नरवाडे, अनिता देशमुख, रामेश्वरी कांबळे, बाळासाहेब पाटील आदींची उपस्थिती होती. लसीकरणाबाबत यावेळी जनजागृती केली.

बातम्या आणखी आहेत...