आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकशी:बनावट दारू; सूत्रधारांच्या मागावर 2 पोलिस पथके

भुसावळ3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रूईखेडा (ता.मुक्ताईनगर) येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त केला होता. याप्रकरणी एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल झाला. त्यापैकी तिघांना अटक झाली असून पसार असलेल्या दोघांच्या शोधासाठी दाेन पथके रवाना झाली आहेत. तसेच बनावट दारू भरण्यासाठी रिकाम्या बाटल्या, स्टिकर व स्पिरिट कुठून आणले? याची माहिती काढणे सुरू आहे.

रूईखेडा येथे मंगळवारी (दि.२२) मध्यरात्री कारवाई करून बनावट दारूच्या कारखान्यातून १७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बाटल्यांमध्ये दारू भरणाऱ्या तीन संशयितांना अटक करण्यात आली. जागा मालक व कारखान्यात दारू निर्माता पसार आहे.

त्यांच्या शोधासाठी दोन पथके रवाना झाली आहे. तर अटकेतील विशाल खाचणे, किनय चाैधरी, याेगेश पाटील यांच्याकडून बनावट दारू निर्मितीसाठी स्पिरीट, रिकाम्या बाटल्या, बाटल्यांचे बूच, स्टिकर कुठून आणले? ही माहिती काढणे सुरू आहे, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक जितेंद्र गाेगावले यांनी सांगितले. भुसावळचे विभागीय निरीक्षक सुजित कपाटे तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...