आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट दारू प्रकरण:बनावट दारू; सूत्रधारांच्या मागावर दोन पोलिस पथके, बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त

भुसावळ2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रूईखेडा (ता.मुक्ताईनगर) येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त केला होता. याप्रकरणी एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल झाला. त्यापैकी तिघांना अटक झाली असून पसार असलेल्या दोघांच्या शोधासाठी दाेन पथके रवाना झाली आहेत. तसेच बनावट दारू भरण्यासाठी रिकाम्या बाटल्या, स्टिकर व स्पिरिट कुठून आणले? याची माहिती काढणे सुरू आहे. रूईखेडा येथे मंगळवारी (दि.२२) मध्यरात्री कारवाई करून बनावट दारूच्या कारखान्यातून १७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बाटल्यांमध्ये दारू भरणाऱ्या तीन संशयितांना अटक करण्यात आली. जागा मालक व कारखान्यात दारू निर्माता पसार आहे.

बातम्या आणखी आहेत...