आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काम संथगतीने:शहापूर-मुक्ताईनगर चौपदरी मार्गासाठी मोजणी संथगतीने

भुसावळ5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्य प्रदेश महाराष्ट्राला जोडणाऱ्या शहापूर-मुक्ताईनगर या ३० किलोमीटर मार्गाचे चौपदरीकरण होणार आहे. मात्र, त्यासाठी जागा मोजणीचे काम संथगतीने सुरू आहे. या माेजणीला गती द्यावी, अशी मागणी आहे.शहापूर-मुक्ताईनगर या ३० किमी अंतराचे चौपदरीकरण होणार असून यासाठी ८ गावांमध्ये भूसंपादन सुरू आहे. अंतुर्ली, पिंप्रीभाेजना, कर्की, पिप्रीपंचम, धाबे, पूर्णाड, खामखेडा, मुक्ताईनगर, साताेड अशी ही गावे आहेत.

तेथील ३५० पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पात जाणार आहे. यात ८० हेक्टर २२ आर जमिनीची मोजणी हाेईल. यानंतर तयार होणाऱ्या चौपदरी मार्गामुळे मध्य प्रदेश व महाराष्ट्रात ये-जा करणे अधिक सोयीचे होईल. विशेशत: इंदूर जाण्यासाठी साेईचा मार्ग होईल. त्यामुळे भूसंपादन माेजणीला वेग देण्याची मागणी आहे. भुसावळ प्रांताधिकारी कार्यालयातर्फे भूसंपादनाची प्रक्रिया पार पाडली जात आहे

बातम्या आणखी आहेत...